पोह्यांचे चविष्ट पदार्थ

आपल्या सर्वांचाच पोहे हा पदार्थ सकाळची उत्तम न्याहारी मानला जातो.सर्वजणच आवडीने ह्या पदार्थाची मजा घेतात.रविवार च्या दिवशी जर  हा पदार्थ सकाळची न्याहारी असेल तर मग हा दुग्ध शर्करा योगच नाही का?
पण हे पोहे समजा कधी जास्त बनले तर त्याचे काय करावे हा प्रश्न पडतोच.तर त्यापासून अनेक उत्तम पदार्थ बनू शकतात.उदा.पोह्यांचे कटलेट,,पोह्यांचे पकोडे,पोहा समोसा चाट .हे सगळे पदार्थ चवीस उत्तम बनतात.खाण्यास ही एक वेगळाच आनंद मिळतो.

१. पोह्यांचे कटलेट
साहित्य-पोहे,उकडलेले बटाटे,आलं-लसूण पेस्ट,मसाला,हळद,चवीसाठी साखर,बेसन,,मीठ.

 कृती- प्रथम पोहे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावेत.नंतर त्यामध्ये उकडलेले बटाटे कुस्करून घालावे.आणि त्यानंतर आलं-लसूण पेस्ट,हळद,मसाला,साखर,मीठ,बेसन घालावे.आणि सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून त्याचे गोलाकार कटलेट करून घ्यावे आणि ते शॅलो फ्राय करावेत.टोमॅटो सॉस सोबत किंवा ओल खोबऱ्याच्या चटणीसोबत खाण्यास उत्तम लागतात.




 





२. पोहा समोसा चाट
साहित्य-तेल,पोहे,उकडलेले बटाटे,आलं-लसूण पेस्ट,हळद,साखर,मसाला,मैदा,पाणी,ओवा,दही,चाट मसाला,शेव मीठ. 

कृती-वरीलप्रमाणेच पोहे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे.एका भांड्यात तेल गरम करून त्यामध्ये थोडी साखर,हळद,मसाला,आलं लसूण पेस्ट घालून नीट परतून घ्यावे.नंतर त्यामध्ये पोहे,उकडून कुस्करलेले बटाटे,मीठ घालून सर्व मिश्रण एकत्र करावे.नंतर मैदा,ओवा,मीठ,तेल आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावे.नंतर वरतून त्याला तेल लावून १५-२० मिनिट एका कपड्याने झाकून ठेवावे.नंतर छोटे गोळे करून त्याची पारी लाटून घ्यावी आणि त्यामध्ये समोस्याचे मिश्रण घालावे.आणि एका कढईत तेल गरम करून त्यामध्ये समोसे तळून घ्यावेत.नंतर तळलेले समोसे एका ताटात घेऊन त्याचे बारीक तुकडे करावेत.दह्यामध्ये थोडा मसाला,चाट मसाला,घालून नीट एकत्र करावे. आणि हे दह्याचे मिश्रण समोस्यांवर घालावे.





३. पोह्यांचे पकोडे
साहित्य-चण्याची डाळ.मूग डाळ,पोहे,आल,लसूण,ओवा,हिरवी मिरची,बेसन,कोथिंबीर,चवीसाठी साखर.मीठ

कृती-प्रथम चण्याची डाळ आणि मूग डाळ एकत्र २-३ तासासाठी भिजत ठेवावी. नंतर पोहे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावेत.त्यानंतर दोन्ही डाळी पाणी न घालता मिक्सर च्या भांड्या    मध्ये घ्याव्यात आणि त्यामध्ये लसूण,आलं,हिरवी मिरची,कोथिंबीर,ओवा हे मिश्रण घालून बारीक वाटून घ्यावे.नंतर डाळीचे मिश्रण पोह्यांमध्ये एकत्र करावे आणि त्यामध्ये थोडी साखर,चवीसाठी मीठ,ओवा,आणि थोडे बेसन घालून सर्व मिश्रण एकत्रित करावे. आणि कढईत तेल गरम करून त्यामध्ये छोट्या आकाराचे पकोडे तळून घ्यावेत.ओल्या खोबऱ्याची चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत खाण्यास चविष्ट लागतात.

Comments