कॉर्न कॅप्सिकम बॉल्स
साहित्य
एक वाटी उकडलेले मक्याचे दाणे,चार उकडलेले बटाटे,चार बारीक चिरलेली शिमला मिरची,दोन चमचे शेजवान सॉस,एक बारीक चिरलेला कांदा,एक चीज क्यूब,सहा लसूणच्या पाकळ्या,अर्धा चमचा मसाला,पाव चमचा हळद,दोन चमचे मैदा,एक चमचा तांदळाचे पीठ,दोन चमचे बेसन,तेल,कॉर्नफ्लेक्स,चवीनुसार मीठ.
कृती
प्रथम उकडलेले मक्याचे दाणे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे. नंतर उकडलेले बटाटे मॅश करून घ्यायचे. एका भांड्यात तेल गरम करून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट,बारीक चिरलेला कांदा नीट परतून घ्यायचे आणि त्यामध्ये मसाला,हळद घालायचे.त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची,मक्याचे दाणे,उकडलेली बटाटी,शेजवान सॉस,चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण एकत्रित करायचे. त्यांनतर सर्वात शेवटी गॅस बंद करून त्यामध्ये चीज किसून घालायचे.ते सर्व मिश्रण थंड करून घ्यायचे आणि त्यामध्ये दोन चमचे बेसन घालून एकत्रित करायचे.त्या मिश्रणाचा गोळा तयार झाला पाहिजे त्या प्रमाणे बेसन घालायचे.त्या मिश्रणाचे लहान आकाराचे बॉल्स तयार करायचे. नंतर एका भांड्यात मैदा आणि तांदळाचं पीठ घेऊन त्यामध्ये पाणी,पाव चमचा मीठ घालून घट्ट अस बॅटर बनवून घ्यायचे.दुसऱ्या भांडयात कॉर्नफ्लेक्स हाताने बारीक करायचे किंवा मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे.तयार केलेले बॉल्स एका हाताने मैद्याच्या बॅटर मध्ये घोळवून घ्यायचे आणि नंतर दुसऱ्या हाताने ते बॉल्स कॉर्नफ्लेक्स मध्ये घोळवून घ्यायचे आणि डीप फ्राय करून घ्यायचे.हे बॉल्स मेयॉनीज किंवा टोमॅटो सॉस सोबत खाण्यास चवीस उत्तम लागतात.




Comments
Post a Comment