चपातीचे चॉकलेट बॉल्स.उरलेल्या चपात्यापासून बनणारा एक उत्तम पदार्थ. आपल्याकडे कधी-कधी चपात्या उरतात तर त्या चपात्यांचे काय करायचे हा आपल्याला प्रश्न पडतो.तर त्या चपात्यांचा वापर करून मी हा एक नवीन पदार्थ बनवला.खूप उत्तम पदार्थ बनला. तुम्ही सुद्धा सगळे हा पदार्थ बनवून बघा.ह्या पदार्थामध्ये व्हाईट चॉकलेट,डार्क चॉकलेट असल्यामुळे लहान मूल किंवा सगळेच जण हा पदार्थ नक्की आवडीने खातील. तसेच ह्या पदार्थामध्ये बदाम असल्यामुळे हा पदार्थ आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे.तर नक्की हा पदार्थ बनवून बघा.
कृती-
प्रथम चपात्या,साखर,बदाम एकत्र मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे.नंतर
त्यामध्ये थोडे दूध घालावे.त्यानंतर डार्क चॉकलेट ओव्हन मध्ये दोन मिनिट
ठेवावे आणि ते चॉकलेट चपाती च्या मिश्रणात मिक्स करून घ्यावे.नंतर त्या
मिश्रणाचे छोटे बॉल्स करून घ्यावेत नंतर व्हाईट चॉकलेट ओव्हन मध्ये दोन
मिनिटे ठेवावे.सर्वात शेवटी ते बॉल्स व्हाईट चॉकलेट मध्ये घोळवून
घ्यावे.नंतर रेफ्रिजरेटर मध्ये 15 मिनिटे सेट करावे.
साहित्य- चार चपात्या, सहा बदाम,दूध,डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट, एक चमचा साखर
कृती-
प्रथम चपात्या,साखर,बदाम एकत्र मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे.नंतर
त्यामध्ये थोडे दूध घालावे.त्यानंतर डार्क चॉकलेट ओव्हन मध्ये दोन मिनिट
ठेवावे आणि ते चॉकलेट चपाती च्या मिश्रणात मिक्स करून घ्यावे.नंतर त्या
मिश्रणाचे छोटे बॉल्स करून घ्यावेत नंतर व्हाईट चॉकलेट ओव्हन मध्ये दोन
मिनिटे ठेवावे.सर्वात शेवटी ते बॉल्स व्हाईट चॉकलेट मध्ये घोळवून
घ्यावे.नंतर रेफ्रिजरेटर मध्ये 15 मिनिटे सेट करावे.
Comments
Post a Comment